आज मी माझ्या काही टेस्ट करण्यासाठी दवाखान्यात गेलेलो.
टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत मी समोर चहाच्या टपरीवर जाऊन चहा व बिस्किटे घेत असताना,, समोरच एक लहान मुलगा एकटक माझ्याकडे बघत होता...!!
मी त्याला बिस्कीट घेतो का...??
म्हणून विचारले, तेव्हा त्याने मान हलवित होकार दर्शविला...!!
मी त्याला बिस्कीटाचा पुडा घेऊन दिला.
पुडा हातात पडताच मुलगा भराभर खाऊ लागला, न जाणे बिचारा किती दिवसापासून उपाशी होता. तो खात असताना मला खूपच समाधान वाटले...!!
त्याचे शेवटचे दोन बिस्कीटे शिल्लक असताना तेथे त्या मुलाची आई आली की जी केव्हापासून रांगेत ऊभी राहून केसपेपर काढत होती.
आईने आल्या आल्या मुलाच्या थोबाडीत मारली, मी हैरान झालो व तेथून हळूच पसार झालो...!!
त्यावेळी आईचे काही शब्द माझ्या कानावर आले...
"कोणत्या कुत्र्यानं तुला बिस्कीट दिली. अरे मी तुला पन्नास रुप्या खर्च करुन रिक्षानं घेऊन आले...
रिकाम्या पोटी टेस्ट करायला...??
मुडदा बशिवला त्या बिस्किट खाऊ घालण्याऱ्याचा"...!!