लॉक डाउन मध्ये मित्रांचा सारखा फोन - मराठी विनोद

लॉक डाउन मध्ये मित्रांचे फोन येत आहेत.

खुप प्रेमाने विचारपूस करतात.
कसा आहेस.
सगळं व्यवस्थित आहे ना....???
बाकी काय चालू आहे.
तब्येत ठीक आहे ना
घरचे सगळे बरे आहेत ना...???

काळजी घ्या.
बाहेर पडू नका.
वाफ घेत चला. आजारी पडू नका.
थंड खाऊ नका. भाजीपाला धुवून घ्या. घरी oximeter आहे ना. ऑक्सिजन लेव्हल रोज चेक करा.
Covid ची औषधाची किट घेतली की नाही. व्हिटॅमिन सी टॅबलेट घेऊन प्रतिकार शक्ती वाढवा.

गहिवरून येत हो असे फोन आले की.
थोडा वेळ का होईना स्वतःला मोठा नशीबवान समजतो की असे काळजी घेणारे आणि करणारे मित्र आहेत आपले.

शेवटी मात्र ते मुद्द्यावर येतात.

"एखादी बाटली पडली आहे का रे घरी...?"