marathi jokes vinod comedy chutkule stories


marathi jokes vinod comedy chutkule stories


एकदा एक बाई पोलिस स्टेशन मध्ये कम्प्लेट करायला जाते.
बाई : अहो साहेब माझा नवरा हरवला आहे हो..
(एवढ बोलून बाई रडायला लागते).
पोलिस : त्यांची उंची काय आहे ?
बाई : नाही हो माहिती नाही कधी मोजली नाही.
पोलिस : बर.. काटकुळे आहेत कि जाडे आहेत ?
बाई : जाडे ? काटकुळे ? नाही हो ते सुद्धा माहिती नाही ...
पोलिस : बर डोळ्यांचा कलर काय आहे ?
बाई : नाही हो खरच नाही माहिती ..
पोलिस : बर डोक्याच्या केसांचा कलर ?
बाई : कलर नेहेमी बदलत असतो हो आत्ताचा नाही माहिती ..
पोलिस : त्यांनी कोणती कपडे घातली आहेत हे ?
बाई : काही माहिती नाही हो... पण कृपा करून शोधा त्यांना
पोलिस : अहो बाई बर मला सांगा त्यांच्या बरोबर अजून कोणी होत का ?
बाई : हो आहे ना माझा कुत्रा आहे त्यांच्या सोबत. कलर पांढरा त्यावर काळे
ठिपके आहेत. डोळे अगदी काळे काळे आहेत. डोळ्यांच्या माध्येभागी कि
नाही एक लाल असा ठिपका आहे हो, गळ्यात चोकलेटी पट्टा आह.
आणि एक कि नाही तो भुंकत नाही हो कोणावर.
त्याची उंची कि नाही जेमतेम उभी मोजली तर १ फुट आणि अडवा ३फुट आहे.
त्याला नॉन वेज खूप आवडत, तस आम्ही सोबतच जेवत असतो हो.
एवढ बोलून ती बाई अजून रडायला लागते.
पोलिस (डोळ्यात आसव आणून ) : हवालदार तोंडे पहिलं त्या कुत्र्याला शोधा