Funny Daru Jokes In Marathi - दारू वर विनोद

मास्तर : इंडिया गेट काय आहे?

मुलगा : बासमती तांदूळ.
मा : चारमिनार?
मु : सिगरेट.
मा : ताजमहाल?
मु : चहा.
मा : गाढवा! देशातील इतकी प्रख्यात स्थळं तुला माहिती नाहीत. जा, तुला नापास केलं. उद्या येताना वडिलांची सिग्नेचर आण.


दुसऱ्या दिवशी पोरगं चकचकीत कागदात गुंडाळलेलं पुडकं आणून टेबलावर ठेवतं.
मास्तर : हे रे काय?
पोरगं : बाबांची सिग्नेचर. आख्खी बाटली आणली.

मास्तर गहिवरून आले. पोराला छातीशी धरून म्हणाले, "अरे वेडा कुठला. कोण म्हणतं तू नापास झाला? तुला शंभर पैकी शंभर!"