Funny Marathi Jokes On Lockdown, Corona virus, vaccination
हे देवा बॉडी तर कधी बनली नाही,आता अँटी बॉडी तरी बनु दे.
----------------------------------------------
आधी "क्वारंटाईनचे" स्पेलिंग नीट पाठ होत नव्हते,
तोच ते "रेमडेसिवीर" मध्येच घुसले होते..!!
ते कुठे जाते न जाते तोच हे नवीन "म्यूकरमायकोसिस" की काय ते आलंय 😳😳
थोडा स्पेलिंग पाठांतराला वेळ तरी द्या.
----------------------------------------------
कोरोना मध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. 🤨
1 ) अतिशय सावधान! 😷
2 ) एकदम बिनधास्त! 😄
*आणि दोघेही एकमेकांना बावळट समजतात.
----------------------------------------------
Vaccination Jokes In Marathi
मला आज एकाने विचारलेला प्रश्न...!!!कोविशील्डची लस घेतलेला मुलगा कोवॅक्सीनची लस घेतलेल्या मुलीशी लग्न करू शकतो का? 🤔
.
.
.
कुणाचं काय तर कुणाचं काय!
----------------------------------------------
Covid Vinod
सकाळी बायको जेवणात मीठ टाकायला विसरली ...अन मी दिवसभर टेंशन मध्ये ना भो...
तोंडाची चव गेली की काय? हा विचार करून करून
----------------------------------------------
Lock Down Jokes
कार घेऊन घरातून बाहेर पडतानागुगल मँप ऑन केले...
.
.
.
तसा आवाज आला...
.
.
फटके हवे असल्यास
पन्नास मिटरवर उजवीकडे वळा.
.
.
उठाबशा काढायच्या असतील
तर डावीकडे वळा..
.
.
हे दोन्हीही नको असल्यास
यु टर्न घेऊन..
चुपचाप
घराकडे वळा...
----------------------------------------------
"... कुलूप सापडलं नाही.मग दरवाज्यावर,
"COVID-19 POSITIVE"
ची पाटी लावून तसाच निघून गेलो भाजी आणायला...!"
सदाशिव पेठ, पुणे
पुढे वाचा
घरी चोरी झाली होती .... भिंतीवर लिहून ठेवले होते
आम्ही PPE Kit घालुनच व लस घेऊनच फिरतो सध्या 🤦♂️🤦♂️🤪🤪🤪😝😝
चोर पण पुण्याचे
----------------------------------------------
मागच्याच आठवड्यात नर्सने मला *वय ४५ वर्षावरील वाटत नाही* या कारणाने लस दिली नाही..... हे माझ्या बायकोने जरा जास्तच मनावर घेतलं.
मग बायकोने घरी येऊन *संतूर* तर लपवलाच पण सोबत *हेयरडाय, रेझर* वगैरे सगळंच लपवलं.
मग आज ती मला पूर्ण तयारीने घेऊन गेली.
नर्स लस टोचतांना म्हणाली....
*बाबा, लवकर यायचं नां हो.... तुमच्या बरोबरच्या लोकांचे दोन दोन डोस झाले सुद्धा....बरं झालं...., तुमच्या सुनबाई चांगल्या आहेत म्हणून आत्ता का होईना तुम्हाला डोस द्यायला घेऊन आल्या...*
*आता कुठे तिचा जीव शांत झाला.
----------------------------------------------
साहेब-का???काही बोलला का तो,आपल्या विरुद्ध
----------------------------------------------
बायकोचा बदला
त्या दिवशी घरी आलो. जेवायला बसलो. स्वयंपाक अगदीच बेचव होता.
वैतागून बायकोला म्हणालो 'जेवण अगदीच बेचव आहे. काहीच चव नाही'.
बायको शांतपणे उठली व डॉक्टरांना फोन केला.
'ह्यांच्या तोंडाला चवच नाहीये'.
थोड्या वेळातच ambulance आली व मला उचलून घेऊन गेली.
गेले दोन आठवडे मी quarantine centre मध्ये ऍडमिट आहे.
----------------------------------------------
इथं घराबाहेर सुद्धा जाता येत नाही ,आणि पेपरमध्ये आजचे राशिभविष्य आलंय ,
प्रवासाचा योग आहे..
🤨🤔
अँबुलन्स येते कि काय.
----------------------------------------------
एकाच वेळी मास्क,गॉगल आणि इयरफोन ला सांभाळून घेतल्याबद्दल, मी माझ्या कानाला सलाम करतो
----------------------------------------------
तुमच्या तोंडात किडे पडो
पार्टी दिल्यासारखं होईल नालायकांना.
----------------------------------------------
कोणी लिहिले माहीत नाही पण मजेदार आहेशिक्षक : मुलांनो , उद्या वर्गात येताना कोरोना वर निंबध लिहून आणा..
मन्या : सर मी करोनावर निंबध लिहीला आहे :
”कोरोना”
कोरोना हा एक नवीन सण असून तो *२०२०* सालापासून सुरु झाला तसेच तो दिवाळी सारखा एक मोठा सण आहे. होळीच्या नंतर येतो आणि पुष्कळ दिवसापर्यंत राहतो.
*चीनने या सणाची सुरुवात केली असली तरी संपूर्ण जगात लोक एकाच वेळी हा सण साजरा करतात* . तसेच हा एकमेव असा सण आहे जो. 👩👩👧👧हिंदु मुस्लिम 🧕👳♀️ख्रिश्चन बौद्ध अश्या सर्व धर्मांतील तसेच श्रीमंत गरीब व मध्यम वर्गीय लोकही साजरे करतात.
*ह्या सणात खूप सारे खाण्याचे 🍲🍩🥘🧀🥪🧆🌮फराळ घरी बनविले जातात. सर्व मिळून 🏡🏠घरात आनंदाने राहतात*. शाळेला पुष्कळ दिवसांपर्यंत सुट्टी असते . दुकाने, ऑफिस सर्व बंद असतात. 📺टीव्ही वर कार्यक्रम पहायला मिळतात. सर्व जण मिळून हा सण साजरा करतात.
*या सणात तोंडाला मास्क😷😷 लावून आणि एकमेकांपासून लांब 👯♂️अंतर ठेवून हा सण साजरा करतात. या सणात पुरुष मंडळी दिवसभर बर्मुडा🩳 आणि टी शर्ट👕 घालून केर फरशी भांडी घासत बसतात तर बायका फक्त स्वयंपाक करतात अन् मोबाईल📱📱 बघत बसतात*
पण हा सण बाहेर रस्त्यावर एकत्र येऊन साजरा केल्यावर दोन ते तीन दिवसात तो🏥🏥 *हॉस्पिटल* 🚑🚑मध्ये एकट्याने साजरा करावा लागतो. व काळजी नाही घेतली तर देवाच्या घरी जावे लागते...
*.........असा हा करोना सण
----------------------------------------------
- वाचा नवीन मराठी जोक्स