Funny Punekar jokes,Puneri Jokes,Puneri Patya आणि खूप काही 😁

funny punekar jokes puneri jokesमिळवा नवनवीन Funny Punekar jokes,Puneri Jokes,Puneri Patya,Puneri Funny Quotes

एक पुणेकर आरशात बघुन स्वतःलाच नमस्कार करित होता..

मुंबईकराने विचारले, हे असं काय करतोय,

पुणेकर म्हणाला "आज गुरुपोर्णिमा ना... आम्हीच आमचे गुरु, आम्हाला कोण शिकविणार?" 
__________________________________________

एकदा एक मुलगा टाइमपास
काहीतरी म्हणून
गुगल वर how to get free lunch in 5
star hotel सर्च करत होता..
.
गुगल नि रिजल्ट दिला..
.
.
.
.
काय पुणेकर का.???
_____________________________________________

पुणेकर एक पोपट पाळतात.
पोपट रोज सकाळी-सकाळी मालकाला ऊठवतो.
पोपट -ऊठा मालक कामाला जायचय ना?

पूणेकरांना पोपटाचा फार अभिमान वाटतो.
काही दिवसांनी पूणेकरांची बदली साेलापूरला होते.
पोपट -ऊठ कि बे झागिरदार...
कामाला कोण तुझा बाप जाणार का कडू?
_____________________________________________

आज  एका पोलिस वाल्याने मला थांबवलं

कारण  हेलमेट घातल नव्हत....

पोलिसा ने  गाड़ी ची चावी काढून घेतली..


आणि म्हटले,
ये माझ्या मागे-मागे'
,.

आम्ही तर पुणेकर  मग काय ?
.

आम्ही खिशातुन  दूसरी चावी
काढली ,
गाड़ी स्टार्ट केली  आणि म्हटलो,
आता तू ये आमच्या मागे-
_____________________________________________

खडूस पुणेकर
आम्ही छत्री का घ्यायची?

पुण्यात पाऊस 28 इंच पडतो.

तो देखील 4 महिन्यात.
महिन्याचा झाला 7 इंच.
अर्धा रात्री पडतो, 12 तासात उरला 3.5 इंच.

दुपारी 3 तास (1 ते 4) आम्ही झोपतो. उरला 0.88 इंच.

एवढ्या टीचभर पावसासाठी ....

आम्ही छत्री का घ्यायची?
_____________________________________________

punekar mumbaikar jokes

मुंबईकर:- काय करता आपण?

पुणेकर:- बिझिनेस आहे माझा!

मुंबईकर:- कसला बिझिनेस आहे आपला?

पुणेकर:-सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्यूअल गारमेंट होल्डिंग डीवाईसेस!!

मुंबईकर:- वा वा ! म्हणजे काय?

पुणेकर:- पायजम्याचे नाडे विकतो मी!_____________________________________________

एकदम खतरनाक पुणेकर

पुणेरीपणा म्हणजे काय हे शिकण्यासाठी एक माणूस पुण्याला गोखले यांच्याकडे आला.

गोखले दारातच उभे होते. त्यांच्यातील संवाद :

माणूस:-तुम्ही हा जो पायजमा घातला आहे तो किती दिवस वापरणार ?

गोखले:-एक वर्ष !

माणूस:- त्यानंतर फेकून देणार ?

गोखले:- नाही ! त्यानंतर आमची सौ त्याच्या हाफ चड्ड्या बनविते.

माणूस:- त्या तुम्ही किती दिवस वापरता ?

गोखले:-  अन्दाजे एक वर्ष.

माणूस:- मग ?

गोखले:-  त्यानंतर त्याची आम्ही पिलोकव्हर बनवितो. ती साधारण सहा महीने वापरता येतात.

माणूस:-   मग ?

गोखले:-   मग त्या फाटलेल्या कव्हरचा उपयोग मी सायकल पुसायला करतो.

माणूस:-  मग ते तुकडे टाकून देता ?

गोखले:-  नाही ! त्यानंतर सायकलची चेन किंवा अन्य तेलकट भाग पुसायला आम्ही ते तुकडे वापरतो, अन्दाजे सहा महीने पुरतात.

माणूस:- त्यानंतर तरी ते मळकट तुकडे तुम्ही टाकून देता की नाही ?

गोखले:- नाही ! त्याचा आम्ही काकडा करतो आणि चूल पेटवण्यासाठी वापरतो.

माणूस:- म्हणजे त्याची राखाडी होईपर्यंत तुम्ही ह्या पायजम्याची साथ सोडत नाही ?

गोखले:- ती राखाडीही आम्ही भांडी घासायला वापरतो.

त्या माणसाने गोखल्यांच्या चरणांना स्पर्श केला
_____________________________________________

काल एक नविन पुणेरी पाटी

वाचून बेशुध्द पडता पडता वाचली ...!!

"आमच्या येथे 13व्या चा स्वयंपाक करून मिळेल..!"

पण..!

१५ दिवस आधी ऑर्डर नोंदविणे आवश्यक
_____________________________________________

पुणेरी ग्राहक :- Underwear दाखवा...

दुकानदार :- ही पहा...

पुणेरी ग्राहक :- कितीला आहे...?

दुकानदार :- फक्त ₹ 1850/-

पुणेरी ग्राहक :- दररोज घालायची दाखवा Party wear नकोय...
आणी हो आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल

दुकानदार : ते का?

पुणेरी ग्राहक : का म्हणजे? अहो जी आत्ता घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून
_____________________________________________

पुणेरी मेडिकल दुकानातील पाटी...

आम्हाला  आमच्या कडील सर्व औषधांची एक्स्पायरी डेट माहित आहे,....

पण तुमची माहीत नाही.,,,,

तेव्हा कृपया उधार मागू नये.
_____________________________________________

No comments:

Post a Comment