New Collection Of Marathi Jokes

पुण्यात एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली..सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना..
तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे कुलकर्णीकाका ओरडले.."काय बाई, कुठलाच कलर पसंद पडत नाहीये का..?
 

( जागो ग्राहक जागो )नवीन जाहिरात

ट्यूशन शिक्षक - अरे गधड्या,
होम वर्क का नही केला तू........?

विद्यार्थी - नीट बोल रताळ्या,
कस्टमरशी असं बोलतात का....?
 

एक मराठी माणूस एका बँकेतजातो आणि

५० हजार रुपयांचं लोन मागतो..!
बँक मॅनेजर त्याला गॅरेंटी विचारतात,
मराठी माणूस म्हणतो बँकेच्या बाहेर माझी BMW उभी आहे....!
बँक मॅनेजर ला तो गाडीचे कागदपत्र देतो ,

५० हजार रुपये घेऊन त्याची BMW बँकेच्या हवाली करतो आणि निघून जातो...!!
बँक मॅनेजर आणि कर्मचारी त्या मराठी माणसावर हसतात,
आणि म्हणतात,
करोडो रुपयांची गाडी वापरतो आणि ५० हजार रुपये नाहीयेत जवळ..!!
२ महिन्यांनी तो मराठी माणूस बँकेत येतो,

आणि त्याची गाडी मागतो..!
मॅनेजर त्याला ५० हजार रुपये आणि त्यावर २ महिन्यांचं व्याज म्हणून १२५० रु. अधिक मागतात...!!
मराठी माणूस पुर्ण पैसे देतो...आणि गाडीच्या चाव्या घेतो..!!
बँक मॅनेजरला रहावत नाही आणि तो विचारतो,
'तुम्ही इतकी महागडी गाडी वापरता आणि ५० हजार रुपये पण नाहीत तुमच्याजवळ??'
त्यावर मराठी माणूस झक्कास उत्तर देतो,
'' काय आहे ना...मी आहे पुण्याचा ,
आणि अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईत आलो होतो...
मुंबई मध्ये आपली गाडी सुरक्षित राहील अशी जागा मला सापडली नाही..
म्हणून तुमच्या बँकेत आलो...माझी गाडी तुमच्याकडे गॅरंटी म्हणून ठेवली..
तुमच्याकडून पैसे पण घेतले ते तुम्हालाच परत केले....
आणि वरुन फक्त १२५० रु. दिले..
आता तुम्हीच सांगा...इतक्या कमी पैशात इतकी महागडी गाडी पार्क करण्यासाठी अशी सुरक्षित
जागा कोणती????
मराठी माणसाच्या नादी लागायच नाही...!!!!!!
शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल?

गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे.

नाहीतर Staff Room मधे जमा करणार.

नियम म्हणजे नियम
new collection of marathi jokes

यारों, 2015 ख़त्म होने में 15 दिन ही बाकी बचे हैं......

कोई गलती, गुस्ताखी, खता हो गई हो तो........

माफी मागून घ्या ... मी आज चांगल्या मूड मध्ये आहे !