P.l.deshpande jokes




P.l.deshpande jokes


"हा आमचा प्रताप" अशी ओळख आई—वडीलांनी करुन दिली तर कसे वाटेल?? —पु. ल. देशपांडे


पु ल देशपांडे विनोद 


हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ‘ त्यात काय ? ‘ सफरचंद ‘ म्हणावं. ‘



pu la deshpande funny quotes


मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘ एअरहोस्टेसला आपण ‘ हवाई सुंदरी ‘ म्हणतो, तर नर्सला ‘ दवाई सुंदरी ‘ का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ‘ वाढपी ‘ म्हणतो, तर वैमानिकाला ‘ उडपी ‘ का म्हणू नये ?’
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ‘ पिताश्री ‘ किंवा ‘ राष्ट्रपिता ‘ म्हणतात





pu la deshpande vinodi katha


एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.

‘एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं “काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?” त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला “या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।”

तात्पर्य :- समोरच्याशी संवाद साधताना आपली अक्कल लक्ष्यात घ्यावी